विचारसरणी
श्री शंकरराव ज्ञानू साठे, मु. पो. अपशिंगे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली हे राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज, उमाजी नाईक, लहूजी साळवे, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवीहोळकर या महान नेत्यांसारखी विचारसरणी असणारा कार्यकर्ता. आण्णाभाऊ साठे सामाजिक पुरस्कार, महर्षी कर्वे पुरस्कार, महिला व बालकल्याण समितीचे माजी सदस्य. सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून ३०० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
पेशंट हेल्थ फौन्डेशन ब्युरोच्या या सरकारमान्य संस्थेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षात सेवेचे कार्य, त्यातून वृद्धांची सेवा, आयामावशी, वार्ड-बॉय, नर्स, मेलनर्स यांना बेबिकेअर प्रशिक्षण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रच्या माध्यमातून तरुनांना रोजगार निर्मिती करून व्यसनमुक्ती व योग्य दिशेची वाटचाल, नर्सिंग आणि पेरामेडीकाल कॉलेज ठिकाण कराड येथे स्थापना, वृद्धाश्रमाचे आयोजन, जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांची सहल घडविणे, सामुदायिक विवाह सोहळा राबविणे, महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा मार्गदर्शन शिबीर राबविणे, गुणवंत विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, खेळाडूना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे. मुख्य शाखा मानखुर्दला असून यांच्या उपशाखा गोरेगाव येथे आहेत.